नमस्कार,
मी वेदपाठक शुभम मी आज तुमच्या समोर आलोय ते म्हणजे 'शब्द श्वासात गुंफलेले' हा नवीन ब्लॉग काढल्यामुळे..
मित्रांनो हे 'शब्द श्वासात गुंफलेले' म्हणजेच मी लिहिलेल्या कवितांचा प्रवास आहे. मी सध्या माझा डिप्लोमा पूर्ण केलाय आणि या 19 वर्षाच्या आत्तापर्यंतच्या माझ्या जीवनात कवितांना सुरुवात झाली ती म्हणजे मी 8 वी ला असताना. आत्तापर्यंत माझ्या शंभर एक कविता लिहून झाल्या आहेत आणि त्याच कविता आणि त्या कविता मी कशा लिहिल्या व त्यामागचे काही प्रसंग मी 'शब्द श्वासात गुंफलेले' यामध्ये तुमच्या समोर मांडणार आहे.
मला खात्री आहे की माझ्या या लिखाणाला तुमचा उत्तमच प्रतिसाद मिळेल.आज मी आपल्यासमोर माझी एक कविता देत आहे..त्यामुळे ती कशी वाटली हे नक्की कळवा..🙏🙏
शब्द श्वासात गुंफलेले...!!
भावनांचे नभ जे मनात दाटलेले
कवितेत माझ्या शब्द श्वासात गुंफलेले.. ।।१।।
बोल वेड्या मनीचे येतात ओठांवरती
त्या स्वरात शब्द माझे हृदयात गुंतलेले...।।२।।
प्रेम जीव्हाळा आपुलकी रंग याचेच सारे
आयुष्य कविता माझी या रंगात रंगलेले...।।३।।
कविता माझी नाळ मनाचे बंध जोडणारी
शब्द नव्हेत केवळ हे आर्त स्वर काळजातले..।।४।।
भावनांचे नभ जे मनात दाटलेले
कवितेत माझ्या शब्द श्वासात गुंफलेले..।।५।।
- वेदपाठक शुभम संतोष©
लातूर
3 comments:
खुप छान शुभम असंच प्रगती करत राहा
Sandesh (Sandy) - lvkr tak . Ly aturata lagliy Tuzya Kavitechi. And i wish u become a Big .
Nice
Post a Comment