कालच्या त्या कवितेनंतर मी तर खूप खुश होतो
कारण माझं पाहिलेलं स्वप्न आज माझ्या हातात होतं.त्याच आनंदात मी आज शाळेत जरा लवकरच पोहोचलो. कधी सर वर्गात येतील आणि कधी मी माझी कविता त्यांना दाखवतोय असं झालं होतं.
आता मला मात्र राहवत नव्हतं , रोज शाळेत गेल्यानंतर शाळा भरे पर्यंत खेळणारा मी माहित नाही आज मात्र शाळा भरण्याची अगदी आतुरतेने वाट पाहत होतो..!

शेवटी शाळेची बेल वाजली आणि माझं वाट पाहून संपलं. नेहमीप्रमाणे परिपाठ झाला , गाणी झाली अन मी म्हणजे मागे.. सर कविता दाखवल्यावर काय म्हणतील ? त्यांना आवडेल का? अशा विचारात मग्न.
रोजच पहिला तास मराठीचा असायचा त्यामुळे आता जास्त वाट पाहावी लागणार नाही यामुळे खूप बरं वाटत होतं. सर वर्गात आले आणि त्यांनी विचारलं " तर मग , कोणी कोणी लिहिलंय कविता ? चला हात वर करा " सरांच हे वाक्य संपताच रोज शांत असणारा मी आज अचानक मोठ्याने ओरडलो.."सर मी...!!"
रोज सरांनी काही विचारल्यावर मुलांचा जो 'सर मी' , 'सर मी' असा गोंधळ असतो तो आज जाणवला नाही. मी एकटाच मुलं ओरडतील तेंव्हा आपला आवाज मोठा यावा म्हणून जोरात म्हणालो होतो...असा एकटाच मोठ्याने ओरडल्याने मी क्षणभर जरा शांतच झालो.
मग सरांनीच जवळ येऊन पाठीवर शाबासकीची थाप दिली आणि कवितेची वही हातात घेतली. सर शांतपणे कविता वाचत होते आणि माझे डोळे त्यांचे हावभाव पाहत होते. मला याचीच उत्सुकता जास्त होती की सर कविता वाचून काय म्हणतील..
सरांनी कविता वाचली आणि एक गोड असं स्मितहास्य केलं. त्यांच्या त्या नजरेत असं दिसत होतं की त्यांना ही कविता खूप आवडलीय.
मग सरांनी मला जवळ बोलावलं आणि परत एकदा पाठीवर हात ठेवला आणि कविता वाचायला सांगितली. मग मी पहिल्यांदा आज स्वतः लिहिलेली कविता माझ्या वर्गासमोर वाचत होतो.....मी कवितेला सुरुवात केली...
एक दिवस काय झालं
चमत्कारच घडला
एक झाड मला
चक्क बोलूच लागला...।।१।।
जेंव्हा मी भिऊन
पळू लागलो लांब
तेंव्हा झाड म्हणाले मला
थांब जरा थांब...।।२।।
झाड म्हणाले मला
मी उदास असतो खूप
आता माझ्याभोवती माकडे
करत नाहीत हुपहूप...।।३।।
या वृक्ष तोडीमुळे
आमची होत आहे हानी
मग पाखरांना कोठून मिळणार
खायला दाना पाणी...।।४।।
म्हणून मी विनंती करतो
आतातरी जागे व्हा
प्रेत्येकान एक तरी
झाड लावून जगवा...।।५।।
झाडे लावा झाडे जगवा
हा संदेश भला
हा संदेश पाळून
वाचवा या सुंदर पृथ्वीला...।।६।।
हा संदेश पाळून
वाचवा या सुंदर पृथ्वीला...!! "
माझी कविता संपल्या बरोबर सर्वांनी टाळ्यांचा कडकडाट केला ती त्यादिवशी मला मिळालेली सर्वांत
अनमोल अशी भेट होती..!! आणि त्याच दिवसापासून सुरु झाला माझ्या कवि जीवणाचा प्रवास ; ज्यामध्ये अर्जुनाला जसा मार्गदर्शन करणारा सारथी कृष्ण होता अगदी त्याचप्रमाणे माझ्या या प्रवासातील सारथी माझे आवडते 'स्वामी सर' होते.
अजूनही त्यांची पाठीवरची थाप कायम आहे ज्यामुळे मी लिहू शकतो हे मला कळलं आणि त्यांच्याच मुळे हे मी मांडू शकलो..🙏🙏🙏

*(पुन्हा भेटू अशाच माझ्या नवीन कवितासोबत आणि काही जीवनातील खास प्रसंगासोबत)😊🙏🙏🙏
- वेदपाठक शुुभम
- वेदपाठक शुुभम